मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

0
189

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – वृक्षारोपण, फळवाटप, रक्तदान, महाआरती अशा विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी मनसे प्रमुख  राज ठाकरे यांचा  वाढदिवस  पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जुनी सांगवीत मुळा व पवना नदी पात्राजवळ  देशी वृक्ष वड, पिंपळ, चिंच, वृक्षारोपण करण्यात आले. सांगवी प्रभाग क्रमांक 46 च्या वतीने नियोजन करण्यात आले. वायसीएममध्ये फळ वाटप करण्यात आले.  काळेवाडी भागामध्ये  पाचपीर चौकात  रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रभाग क्रमांक 13 सद्गुरु दत्त उद्यानामध्ये  महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. रुपीनगर हनुमान  मंदिरामध्ये  महाआरती झाली. चिंचवडगावातील  श्री राम मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात आली. मोरवाडीत वृक्षारोपण करण्यात आले.

शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहर अध्यक्ष, राजू सावळे, बाळा दानवले , विशाल  मानकरी , विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे,दत्ता देवतरासे, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, सचिव अनिकेत प्रभू, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी ताई बांगर, अनिताताई पांचाळ, सचिव सीमाताई बेलापूरकर, जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष  राजू भालेराव, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष, सुशांत जी  साळवी, राजेशजी अवसरे, नाथा भाऊ शिंदे, सचिन पगार, सुरज जाधव, देवेंद्र निकम, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, प्रभूने ताई शेख, संघटक विनोद भंडारी , परमेश्वर चिल्लरगे, अक्षय नाळे, सोमनाथ स्वामी, महेश बडगुजर, शहर संघटक पुनीत गळीतकर, नारायण पठारे, शैलेश तलाठी, सागर सोनटक्के   या सर्वांनी
कार्यक्रमाचे नियोजन केले होते.