मध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ?; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच

0
756

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये  अटीतटीची लढाई सुरु आहे. दोन्ही पक्षांमध्ये काही जागांचे अंतर आहे. काँग्रेसकडे आता आघाडी असली तरी काँग्रेसच सत्तेवर येईल, असे काही ठामपणे सांगता येत नाही. जर काँग्रेस येथे सर्वात मोठा पक्ष ठरला तर पक्षासमोर मुख्यमंत्रिपदाचा   पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   

मध्य प्रदेशात काँग्रेसने कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंदिया आणि दिग्विजय सिंह या तिघांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड करणे काँग्रेस अध्यक्षांसमोर मोठे आव्हान असेल. सध्या ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि राहुल गांधींचे तरुण सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया यांचे नांव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर  सावध पवित्रा घेतला आहे. पुढचे मुख्यमंत्री कमलनाथ असे फलक लागले आहेत.  यावर त्यांनी  पूर्ण निकाल हाती येऊ दे, असे उत्तर दिले आहे. कलमनाथ पक्षाचे जुने  नेते  आहेत. त्यांना आमदारांचाही पाठिंबा आहे. कमलनाथ यांना माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते  दिग्विजय सिंह यांचा देखील पाठिंबा मिळू शकतो.