राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष

0
1079

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याने पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी (दि. ११) आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष केला.

सचिन साठे म्हणाले, “पाच राज्यातील जनतेने भाजला नाकारले आहे. देशातील छोटे, मोठे, उद्योजक, व्यापारी, कामगार, शेतकरी, गृहिणी महागाईने त्रस्त झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करु असे सांगणाऱ्या मोदींनी नोटाबंदी केल्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली. ‘मेक इन इंडिया’चा फसवा फुगा फुटला आहे. साडेचार वर्षातील अपयश झाकण्यासाठी ‘राममंदिराचा’ मुद्दा या पाचही राज्यातील विधानसभा निवडणूकीत पुढे आणण्यात आला. भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीला देशातील पाचही राज्यातील जनतेने नाकारले असल्याचे त्यांनी सांगितले.”