मंत्री आहोत याचं भान ठेवा, उगाच पाण्याच्या टाकीवर चढू नका – अजित पवार

0
562

मुंबई,दि.३१(पीसीबी) – मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पहिलीच मंत्री परिषद पार पडली. आपण भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलो असलो तरी आपल्याला जनतेने निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत आपण सगळे एक आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

“आपण आता मंत्री आहात याचं भान ठेवून वागा. उगाच कोणत्याही विषयावरून पाण्याच्या टाकीवर चढण्याचं आंदोलन करू नका. आता तुम्हाला कोणी खाली उतरवणार नाही. कर्जमाफी तसेच सरकारचे अन्य निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम करा” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

सरकारने सर्व विचार करून योजना आणली असून नियमित कर्ज भरणारे तसेच दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतही योजना आणली जाईल, असं मुख्यमंत्र्यानी बैठकीत स्पष्ट केल्याचं समजतंय.