“भारताचा इतिहास पाहून तोंड बंद ठेवावे”; वारीस पठाण यांना विश्व हिंदू परिषदेचा इशारा

0
446
पिंपरी, दि.२१ (पीसीबी) – विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये  आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.
मिलिंद परांडे म्हणाले, पठाण यांच्यावर चहूबाजूने टिका होत असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनेही याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परिषदेचे मिलिंद परांडे यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावे. हिंदुना धमकावून परिणाम होणार नाही. इतिहास काळापासून जे काही हिंदू समाजावर संकट आली आहेत. त्याची हिंदू समाज चिंता करायला सक्षम आहे,” असा थेट इशाराच परांडे यांनी वारीस पठाण यांना दिला.