भाजप आमदाराकडे डोळे पांढरे होतील इतके मोठे घबाड

0
170

कोल्हापूर, दि. २० (पीसीबी) : निवडणूक आली की देशात राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु असते. मग मतदार काही दिवसांसाठी राजा होतो. राजकीय पक्ष व नेते मतदारास संमोहीत करण्यासाठी अनेक बेकायदेशीर मार्ग अवलंबतात. त्यासाठी बेहिशोबी संपत्ती म्हणजे काळा पैशांचा वापर केला जातो. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचा परिणाम कर्नाटकचा सीमा भाग असलेल्या कोल्हापूरमध्येही दिसून येत आहे. आता कर्नाटकात सत्ताधारी भाजप आमदाराकडे मोठी रक्कम सापडली आहे. या प्रकरणी त्यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत आढळली एक कोटी 54 लाखांची रोकड सापडली आहे. पोलिसांनी ही रोकड केली जप्त केली आहे. तसेच अनधिकृत रोकड प्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी अनधिकृत रक्कम मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. नुकतेच याबाबत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढले होते. त्यानुसार कर्नाटकात केवळ आठ दिवसांत 69.36 कोटी रुपये रोख, दारू आणि इतर साहित्य जप्त केल्याचे म्हटले होते.

आयकर विभागाकडून पुढील कारवाई –
कर्नाटकातील रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत कोट्यवधींची रक्कम सापडल्यानंतर आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. ही रक्कम कुठून आली आणि कुठे जात होती, ही माहिती पोलिसांकडून घेतली जात असताना हा काळा पैसा आहे का? याचा शोध आयकर विभाग घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड सत्ताधारी आमदाराकडे सापडल्याने खळबळ उडली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाकडून कोगनोळी टोल नाक्यावरुन जाणाऱ्या – येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. तपासणी दरम्यान लाखोंची रोकड सापडत आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होणार आहे. त्यापूर्वी पैशांचा पाऊस सुरु झाला आहे.

कर्नाटकात मोठी रक्कम जप्त –
मागील आठवड्यात कर्नाटकात जप्त केलेल्या रकमेत 22.75 कोटी रुपये रोख आहेत. 24.45 कोटी रुपयांची दारु आहे. मतदारांना देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तूंची किंमत 12 कोटी रुपये आहे. जप्त केलेल्या साहित्यात रोख रक्कम, दारू, भेटवस्तूंसोबत ड्रग्जसुद्धा आहे. एकूण 69 कोटी 36 लाख 17 हजार 467 रुपयांचा समावेश आहे.