‘या’ भाजपा नेते आणि माजी खासदाराने अभिनेत्री कंगणाला सुनावले खडेबोल; म्हणाले….

0
312

मुंबई, दि.३(पीसीबी) : बॉलीवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगणा राणावतला भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी खडे बोल सुनावत तिचा समाचार घेतला आहे. अभिनेत्री कंगणाने पोलिसांविरोधात भाष्य केलं होतं. त्यावर उत्तर देत ‘आमच्या पोलिसांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही’, असं निलेश राणे यांनी तिला बजावलं आहे.

काही दिवसांपूर्वी कंगणाची बदनामी करणारं ट्विट लाईक करण्यावरून कंगणा आणि मुंबई पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी कंगणाने स्क्रिनशॉटसह ट्विट केलं होतं. “सुशांतला मारणाऱ्यांविरोधात लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारं ट्विट लाईक केले जातात. याचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस त्यांना प्रोत्साहन देत आहे. लज्जास्पद!”असं कंगना म्हणाली होती.

अभिनेत्री कंगणा राणावतने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची भिती वाटत असल्याचं एक वक्तव्य केलं होतं. कंगणाच्या या वक्तव्यावरून निलेश राणे यांनी तिला चांगलेचं धारेवर धरून तिचा समाचार घेतला आहे. तस निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

“अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.” असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.