भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

0
843

डोंबिवली, दि. २४ (पीसीबी) – डोंबिवलीतील भाजप आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे रस्त्यामध्ये उभे राहून शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ते कोणाला शिवीगाळ करत असल्याची माहिती अद्यापही समजलेली नाही. मात्र, ते पोलीस अधिकारी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असल्याचे माहिती मिळत आहे. हा व्हायरल व्हिडिओ महिनाभरापूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.

चव्हाण हे यापूर्वीही डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांना शिवीगाळ करत असताना कॅमेरात बंदिस्त झाले आहेत. तर उल्हासनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकादरम्यान शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून चव्हाण यांनी फोटो काढल्याप्रकरणी त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्ष याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.