बेदम मारहाण करत तरुणाचा खून, चौघांना अटक

0
711
crime

आकुर्डी, दि. २८(पीसीबी)- बांबू, बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चौघांनी एका तरुणाचा खून केला. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी पंचतारानगर, पांढरकरवस्ती, आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अली सय्यद (वय 20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नौशाद हकीबुल्ला साह (वय 21), मोहम्मद मुबीन हकीबुल्ला साह (वय 18), शमीम हकीबुल्ला साह उर्फ पुल्लू (वय 27), सुजित सुभाष पाल (वय 18, सर्व रा. आकुर्डी) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता फिर्यादी मुलाचे आरोपी नौशाद याच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. ते भांडण मित्रांनी सोडवले. त्यानंतर तासाभराने आरोपी फिर्यादीकडे आले. त्यांनी फिर्यादी मारहाण केली आणि पळून गेले. याबाबत फिर्यादीने मित्र अली सय्यद यास सांगितले.

या भांडणाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्याचा मित्र अली सय्यद हे आरोपींकडे गेले. तिथे आरोपींनी अली सय्यद याच्या डोक्यात लाकडी बॅट, दांडक्याने मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी आणि अली सय्यद या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. अली या गंभीर जखमी झाला. दोघांना पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

फिर्यादी मुलगा उपचार घेऊन त्याच दिवशी घरी आला. मात्र त्याचा मित्र अली सय्यद हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा देखील 27 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.