बीएसएफ जवानाच्या आईने केला २७०० कि.मी. चा प्रवास; विश्व हिंदु परिषदेच्या स्वयंसेवकांनी केली मदत

0
299

प्रतिनिधी,दि.१७ (पीसीबी) : कोरोनामुळे संपूर्ण देश लाॅकडाऊन असतानाही दवाखान्यात मृत्युशी झुंज देणाऱ्या बीएसएफ जवानाच्या आईने त्याला भेटण्यासाठी सहा राज्य पालथी घालत तब्बल २७०० किमी प्रवास केला. जोधपूर येथे तैनात असलेल्या बीएसएफ जवान ‘मायोसाइटिस’ या आजाराने बाधीत झाल्याने त्याला जोधपूर मधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अरुण कुमार हा केरळचा असून सध्या त्याची पोस्टींग जोधपूर बीएसएफ येथे करण्यात आली. त्याला मायोसाइटिस या आजाराने ग्रासल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील एका मलयाली डाॅक्टरने अरुण कुमारच्या घरी ही माहिती फोन करुन दिली. आपला मुलगा आजारी असल्याचे कळताच आईचा जीव कासावीस झाला. कोरोना मुळे देश लाॅकडाऊन आहे, विमान, रेल्वे व दळणवळणाची सर्व साधने बंद असल्याने केरळ ते राजस्थान येथे पोहोचणे अशक्यच होते. परंतु जवानाच्या आई शीलाम्मा वसनने अनंत अडचणींना तोंड देत जीव मुठीत धरुन कारने सलग तीन दिवस २७०० कि.मी. अंतर पार करत केरळ, तनीळनाडु, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात राजस्थान असा प्रवास केला.

लाॅकडाऊन असल्याने प्रवास करण्यासाठी परवानगीची आवश्यक होती. शीलाम्मा वसन यांनी त्यांच्या परिसरातील विश्व हिंदु परिषदेच्या स्वयंसेवकांकडे धाव घेतली व केंद्रीय मंत्री वी मुरलीधरन, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने त्यांना प्रवाशांसाठी सही राज्यांचा विशेष पास दिला. विश्व हिंदु परिषदेच्या स्वयंसेवकांनी त्यांना ६ राज्याचा प्रवास करण्यासाठी दोन कॅब व एक टाॅक्सीची सोय विनामुल्य करुन दिली.
जोधपूर येथे पोहोचल्यावर एम्स रुग्णालयातील डाॅक्टरांने जवान अरुण कुमारची तब्येत स्थीर असून त्यात सुधारणा होत असल्याचे त्याच्या आई ला सांगितल्यावर आईचा जीव भांड्यात पडला.