मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची हिंमत गृहखात्यात आहे का?आणखी कोणी निरपराध शोधणार?

0
406

 

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – देशात आणि राज्यात कोरोनाच संकट आहे. कोरोनाच्या रुग्णांची आणि त्यात दागावनार्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. यातूनच नागरिकांकडून कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांच्याशी भेदभाव, त्यांच्यावर बहिष्कार अश्या घटना घडल्या होत्या.

त्यामुळे सरकारने कोरोना बाधित रुग्णाचे नाव आणि माहिती देण्यास मनाई केली आहे. तसे केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. हाच मुद्दा पकडून भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दखल करावा अशी मागणी केली आहे.

निरंजन डावखरे तर पुढे जाऊन म्हणाले कोरोना रुग्ण पत्रकाराचे नाव जाहीर करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची हिंमत गृहखात्यात आहे का?कि आव्हाडांऐवजी आणखी कोणी निरपराध शोधणार?