बिल्डींग मटेरियल टाकण्यावरून वाद

0
221

मारुंजी,दि.१५(पीसीबी) – बिल्डींगचे मटेरियल टाकण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून एकाने कारची काच फोडून कारचे नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 14) दुपारी साडेबारा वाजता साईरंग सिटीगेट, मारुंजी येथे घडली.

तुषार संताजी चव्हाण (वय 31, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित बाबुराव बुचडे (रा. मारुंजी, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार आणि आरोपी रोहित यांच्यामध्ये बिल्डींग मटेरियल टाकण्यावरून बुधवारी दुपारी वाद झाला. ‘मी इथे साईट चालू झाल्यापासून बांधकाम मटेरिअल टाकत आहे. तू टाकू नकोस’ असे तुषार यांनी रोहित याला सांगितले. यावरून रोहितने तुषार यांना शिवीगाळ करत तुषार यांच्या कारवर दगड मारून काच फोडली. तसेच रोहित याने तुषार यांना ‘तुला मारून टाकीन’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. चाकूने तुषार यांच्या डोळ्याच्या खाली मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.