जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

0
203

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – मुळशी तालुक्यातील गिरीवन प्रकल्पातील भूखंडाचे प्रकरण जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या चांगेच अंगलट आलेले दिसते. प्लॉटधारकांना खोटे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विक्रम गोखले यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

28 ऑक्टोबर पर्यंत विक्रम गोखले यांच्याविरोधात कोणताही कारवाई करू नये, असे आदेश हायकोर्टाने बुधवारी पुणे पोलिसांना दिले आहेत. विक्रम गोखले यांनी केलेला अटकपूर्व जामिन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असता त्यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर बुधवारी न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
गोखले यांच्यासह अनेक रथीमहारथी या प्रकरणात अडकले असून ज्यांनी पैस गुंतविले त्यांच्यात सुध्दा पुणे पिंपरी चिंचवड मधील अनेक मान्यवर आहेत.