बांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन

0
253

पुणे, दि. 19 (पीसीबी): बांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत
राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने ! बांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात भारत आणि बांगलादेश येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले. यात जिहादी आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करावे या मागणीसाठी बांगलादेश, तसेच भारतातील नवी दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, मेघालय, असम, त्रिपुरा, ओडिसा या 15 राज्यांतील हिंदूंनी सहभाग घेतला. तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून 25 ठिकाणी प्रत्यक्ष, तर 112 ठिकाणांहून ऑनलाईन पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना निवेदने पाठवण्यात आली. यामध्ये हिंदु जनजागृती समितीसह देशभरातील 37 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू धर्माभिमानी यांचा आंदोलनात सहभाग होता.‘ट्वीटर’वरही बांगलादेशी हिंदूंवरील आक्रमणांना जोरदार विरोध !

जिहादींकडून बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या आक्रमणाला ‘ट्वीटर’वरही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे दिसून आले. या वेळी भारत आणि बांगलादेश येथील हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी #SaveBangladeshiHindus या ‘हॅशटॅग’चा द्वारे हजारो हिंदूंनी ट्विट केले.

बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांविरोधात जागतिक स्तरावर
सतत आवाज उठवणे आवश्यक ! – तथागत रॉय, माजी राज्यपाल, त्रिपुरा व मेघालय
जो भूभाग आता बांगलादेश म्हणून ओळखला जातो, तिथे हिंदूंची जनसंख्या 1941 मध्ये 29 टक्क्यांवरून 1951 मध्ये 22 टक्के झाली. 1971 ला बांगलादेशची निर्मिती होईपर्यंत हिंदूंची जनसंख्या 18 टक्क्यांवर घसरली आणि आता केवळ 8 टक्के हिंदू येथे उरले आहेत. बाकीचे हिंदू कुठे गेले ? 1971 नंतर बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा हिंदूंना वाटले की, आपल्यावरील अत्याचार थांबतील; मात्र असे झाले नाही. सध्या बांगलादेशमध्ये नवरात्रीत हिंदूंवरील आक्रमणे झाली, मात्र हे काही नवीन नाही. काहीतरी कारणे शोधून येथे हिंदूंवर आक्रमणे नेहमीच केली जातात. बांगलादेशामधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी हिंदूंवरील अत्याचारांविरोधात जागतिक स्तरावर सातत्याने आवाज उठवणे आवश्यक आहे. भारत सरकारनेही हिंदूंवरील आक्रमणे थांबविण्यासाठी बांग्लादेशवर दबाव आणायला हवा, असे आवाहन त्रिपुरा आणि मेघालयचे माजी राज्यपाल श्री. तथागत रॉय यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बांगलादेशी हिंदूंवर जिहादी आक्रमण !’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात भारतातील बांगलादेश दुतावासांकडे हिंदूंनी तक्रारी करणे, निषेध आंदोलने करून दबाव निर्माण केला पाहिजेत. काश्मीरमध्ये मुसलमानांसाठी जाणारे ‘संयुक्त राष्ट्रा’चे प्रतिनिधी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराकडे ढुंकूनही पहात नाही. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी भारत सरकारने आपले प्रतिनिधी मंडळ पाठवून त्याचा अहवाल जाहीर केला पाहिजे. असममधील 6 हजार 652 चौरस किमी एवढ्या मोठ्या भूभागावर अवैधरित्या अतिक्रमण करणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना बाहेर हाकलले पाहिजे. ‘बांगलादेशी मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता पू. रविंद्र घोष, ‘इशित्व फाउंडेशन’च्या संचालिका आरती अग्रवाल आणि अन्य मान्यवरांनी या वेळी बांगलादेशातील हिंदूंची दुस्थिती कथन केली.