शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार

0
543

पिंपरी, दि. 19 (पीसीबी) : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरात जागतिक दर्जाची विज्ञान नगरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आज युवक काँग्रेसच्या वतीने राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निवासस्थानी सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शालेय शिक्षण विभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी उभारण्यात येणार आहे. ३.२३ लाख स्वे फूट जागेवर प्रस्थापित असलेल्या या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधन क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढण्यास मदत होणार आहे. शहराचे भविष्यातील वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून उदयोग नगरी सोबत पिंपरी चिंचवड शहराची विज्ञान नगरी ओळख निर्माण होणार असल्याने युवक काँग्रेसच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे , जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, प्रवक्ते गौरव चौधरी, बेंजामिन काकडे , तुषार पाटील, रेव्ह डॉ. एम. डी. बोर्डे आदी उपस्थित होते.