शरद पवार यांच्या पाठोपाठ आता अजित पवार यांचा पिंपरी दौरा

0
539

पिंपरी, दि. 19 (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भेट दिली शहरातील आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रवादी वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा ही संपन्न झाला.

यानंतर आता पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध काम करण्यासाठी आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे आजी-माजी नगर सदस्यांची तसेच 2017 मध्ये राष्ट्रवादीचे असलेले उमेदवार व शिक्षण मंडळ समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या सर्वांची बैठक घेणार आहेत अशी माहिती माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी दिली .

आज सकाळी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी व शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व त्यांना विनंती केली की पिंपरी-चिंचवड शहरातील आपले पक्षाचे आजी-माजी नगरसेवक तसेच 2017 मध्ये राष्ट्रवादीचे असलेले उमेदवार व शिक्षण मंडळ समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य हे आपल्याशी बोलू इच्छीत आहेत यावर अजित पवार यांनी लवकरच आपण सर्व नगर सदस्यांची बैठक घेऊ असे आश्वासन दिले. असेही माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांना या संदर्भात पत्रही दिले या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगर सदस्यांची एक बैठक होणे आवश्यक आहे माजी नगरसेवक संघटना सदस्य आपल्याला भेटू इच्छितात यापैकी 90 टक्के माजी नगर सदस्य पक्षाने साथ दिल्यास परत निवडून येऊ शकतात. तरी लवकरात लवकर एक बैठक घ्यावी अशी विनंती हि अजित पवार यांना करण्यात आली आहे.
आपण लवकरच पिंपरी चिंचवड शहरात येत असून सर्व आजी-माजी नगर सदस्यांची तसेच 2017 मध्ये राष्ट्रवादीचे असलेले उमेदवार व शिक्षण मंडळ समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या सर्वांची बैठक घेणार असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितल्याचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी सांगितले.