बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त फळ वाटप

0
393

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त इंद्रायणीनगर भोसरी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील साफ सफाई कर्मचाऱ्यांना संत साई इंग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष शिवलींग ढवळेश्वर व मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या वतीने ३० टन कलिंगडचे वाटप करण्यात आले.

बसवेश्वर महाराज यांचे कार्य
भारतात प्राचीन काळापासून भगवान शिवाची उपासना होत आली आहे. नंदी हा भगवान शिवाचे वाहन आणि शिष्य. कृषिप्रधान भारतात वृषभ (बैल) हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वृषभाला नंदीच्या रूपात पूजण्याची प्रथाही भारतात प्राचीन काळापासून आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला गेला आहे. यादिवशी बैलांना शेतीकामाला जुंपण्यात येत नाही. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव ठेवून आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याची परंपरा भारतीयांच्या तरल संवेदनेची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. पशु-पक्षांचे शोषण होऊ नये यासाठी 21 व्या शतकातील मानव कायदे बनविताना दिसतो, परंतु भारतामध्ये प्राणिमात्रांवर दया करणेच नव्हे, तर ईश्वररूपात पाहणे देखील दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग आहे. 900 वषार्र्ंपूर्वी समाजात समरसता निर्माण करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना साक्षात नंदीचा अवतार मानले गेले. संस्कृतमधील “वृषभ’ या शब्दाचे बसव हे कन्नड रूप. सन 1131 मध्ये बसवण्णांचा जन्म झाला. (बसवला लोक प्रेमाने बसवण्णा म्हणत) पुढे लोकांनी त्यांना आदराने “बसवेश्वर’ हे नामाभिधान दिले.

या महान महाराजांची आज जयंती, जयंतीचे औचित्य साधुन इंद्रायणीनगर मधील नागरिकांनी फळ वाटप केले आहे. यावेळी संतोष देशमुख, सिध्देश्वर नेंदाणे, सचिन गव्हाणे, जगन्नाथ डांगे उपस्थित होते.