‘संभाव्य तिस-या लाटेबाबत बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करा’

0
511

 – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे आयुक्तांना पत्र
– लहान मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना करा

पिंपरी,दि.१४ (पीसीबी) – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यता आला असून या लाटेत सर्वाधिक धोका लहान वयोगटातील मुलांना आहे. देशाचे भविष्य असलेल्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत शहरातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.

या पत्रात वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे, “कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन सक्षमपणे करत आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी भयंकर असु शकते. त्यामुळे शहरातील लहान मुलांचा पालकवर्ग देखील घाबरत आहे. त्यामुळे लहान मुलांना येणाऱ्या कोरोणाच्या तिसऱ्या लाटेपासुन दुर कसे ठेवता येईल ? याबाबत बालरोगतज्ञांशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील. यावर चर्चा करावी.

लहान मुले ही देशाचे भविष्य निर्धारित करणारी आहेत, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून पुणे महानगरपालिकेने काही पावले उचलली आहेत. त्याचा विचार करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत ठोस उपाययोजना केल्या जाव्यात. तसेच, नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत कशाप्रकारे मिळतील. यासाठी प्रयत्न करावेत”, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.

– दुस-या लाटेतून शहराला सावध होण्याची गरज

मागील वर्षात देशात दाखल झालेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताच्या दुस-या लाटेत कोरोनाचे रौद्ररुप पाहायला मिळाले आहे. आता कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट आणि त्यामध्ये ० ते १८ वयोगटातील लहान मुलांना असलेला अधिक धोका पाहाता शहराला सावध होण्याची गरज आहे. यापूर्वी केलेल्या उपाययोजनांपेक्षा अधिक चांगल्या आणि सक्षम उपाययोजना करून तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत संजोग वाघेरे पाटील यांनी या निमित्ताने सांगितले आहे.