खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी; ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेता योगेश साहनी यांस लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

0
374

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) : ‘मुलगी झाली हो’ या मालीकेतील अभिनेता योगेश सोहनी हे दिनांक ०८/०५/२०२१ रोजी सकाळी ०७:५० वा.चे सुमारास सोमाटणे एक्झीट चे अलीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोड येथुन त्यांचे कारने जात असताना , त्यांना एका पांढरे रंगाचे स्कॉर्पिओ मधील चालकाने त्यांना हात दाखवुन रोडच्या डाव्या बाजुस थांबण्यास भाग पाडुन , सदर स्कॉर्पिओ चालकाने तुझ्या गाडीमुळे माझे गाडीचा अपघात झाला आहे व एका इसमास दुखापत झाली आहे , तरी अपघाताबाबत पोलीसाकडे तक्रार करायची नसेल तर तु १,२५,००० / -रुपये दे नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल अशी भिती दाखवुन , शिवीगाळ करुन , त्यास एटीएम मधुन ५०,००० / -रुपये रक्कम काढणेस भाग पाडुन , ते पैसे घेवुन गेला होता त्याबाबत अभिनेता योगेश सोहनी यांनी तक्रार दिल्याने तळेगाव दाभाडे ( शिरगाव पोलीस चौकी ) गुन्हा रजि.नंबर १ ९ १ / २०२१ भा द वि कलम ३ ९ २ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने मा.पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश, तसेच पोलीस उप आयुक्त श्री.सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेकडील आधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत दिलेल्या आदेशा प्रमाणे , खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ याचे आदेशान्वये खंडणी विरोधी पथकातील स्टाफ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना , पोलीस अंमलदार आशिष बोटके यास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , अभिनेता योगेश सहानी यास लुटणारा आरोपी योगेश गिरी हा असून तो प्रथम वाईन्स समोर पाषाण -सुसगाव रोड ता.हवेली जि.पुणे येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सापळा रचुन इसम योगेश सुरेश गिरी वय -३७ वर्षे , रा . शिंदे प्लाझा , फ्लॅट नंबर ५०७ , नरे आंबेगाव कात्रज पुणे यास स्कॉर्पिओ गाडीसह ताब्यात घेवुन , चौकशी केली असता , त्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर सोमाटणेगावा जवळ मी माझे वरील स्कॉर्पिओ गाडीतुन जात असताना , एका वाहन चालकास थांबुन , तुझ्या मुळे अॅक्सीडेंट झाला आहे असे सांगुन , त्याला मारण्याची भितीने धाक दाखवुन , त्यास त्याचे एटीएम मधुन ५०,००० / -रुपये काढणेस भाग पाडुन , ते पैसे मी त्याचेकडुन जबरदस्तीने घेतले आहे . असे कबुल केल्याने त्यास पुढील तपासकामी शिरगाव चौकी येथे ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कारवाई पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त श्री.सुधीर हिरेमठ , सहा.पोलीस आयुक्त डॉ.प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप – निरीक्षक महेंद्र पाटील व शाकीर जिनेडी तसेच पोलीस अंमलदार अशोक दुधवणे , निशांत काळे , आशिष बोटके , प्रदीप गोडांबे , किरण काटकर , गणेश गिरीगोसावी , विजय नलगे , संदीप पाटील , शैलेश मगर , आशोक गारगोटे , प्रदीप गुट्टे , यांचे पथकाने केली आहे .