बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

0
269

चिखली, दि. १५ (पीसीबी) -कर्जाची थकबाकी असल्याने बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून आत प्रवेश केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) चिखली येथील चिखली- आकुर्डी रोडवर घडली आहे.

याप्रकरणी मनिष सुरेश वारके (वय 38 रा. सांगवी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून घनश्याम प्रभाकर कानडे , संदीप प्रभाकर कानडे, दत्तात्रय प्रभाकर कानडे व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष याचे संदीप बॅग हाऊस नावाने दुकान आहे. या व्यवसायाकरीता मनीष व इतर आरोपींनी त्यांचे घर फायनान्स कंपनीकडे तारण म्हणून ठेवले होते. यावेळी त्याने वेळेवर हप्ते न भरल्याने बँकेने हे तरण घर जप्त करत ते सील केले. यावेळी आरोपीनी कोणती ही परवानगी न घेता मालमत्तेमध्ये प्रवेश करत आदेशाचा भंग केला. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.