फाशी होतं नसेल तर एन्काऊंटर योग्यच – अण्णा हजारे

0
402

महाराष्ट्र,दि.८(पीसीबी) – अत्याचाराच्या घटना देशात वारंवार घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून देखील आरोपींना शिक्षा फाशीची शिक्षा होत नसंल, तर हैद्राबाद येथील त्या चार नराधमांचा पोलिसांनी केलेला एन्काउंटर योग्यच असल्याचं, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काऊंटर करणंच योग्य आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

देशभर गाजत असलेल्या हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.

त्यामुळे पोलिसांना आता सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी ही ९ डिसेंबरला होणार असून तोपर्यंत आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार करू नका असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.