पिस्तुले ही शोभेची खेळणी नाहीत हे पोलिसांनी दाखवून दिलं – संजय राऊत

0
380

मुंबई,दि.८(पीसीबी) – हैदराबादमधील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला. त्यानंतर या प्रकरणातील चारही आरोपींच्या झालेल्या एन्काऊंटरचीही देशभरात मोठी चर्चा झाली. याबाबत आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून मत मांडलं आहे.

हैदराबाद पोलिसांनी बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या. लोकांना तेच हवं होतं. त्यामुळे ‘पोलीस झिंदाबाद’च्या घोषणा झाल्या. कायद्याचं राज्य कोलमडलं. पोलिसांचं राज्य सुरू झालं. ते जास्त पुढे जाऊ नये,असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कायद्याने जे काम होत नाही ते अनेकदा कायदेशीर शस्त्राने होते. चार बलात्कारी नराधमांना हैदराबाद पोलिसांनी ठार केलं. पोलिसांच्या कमरेवर लटकणारी पिस्तुले ही शोभेची खेळणी नाहीत हे पोलिसांनी दाखवलं,असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.