महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती; उद्धव ठाकरेंचा निर्णय

0
568

मुंबई,दि.८(पीसीबी) – महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे या त्रुटी दूर झाल्यानंतर परीक्षा या महापरिक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी नोकरभरतीची प्रक्रिया महापोर्टलद्वारे घेतली जात असे पण मागील काही दिवसांपासून या पोर्टलवर विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेतले जात होते. याच पार्श्वभूमीवर सर्व त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परिक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसापासून पोर्टलबाबत अनेक तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त होत होत्या. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाने बैठक आयोजित केली होती. याच पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.