फडणवीस सरकारच्या कामाचा ‘लेखा-जोखा’ आता एका क्लिकवर

0
625

मुंबई, दि, १९ (पीसीबी) – ‘सर्वांसाठी न्याय्य संधी आणि विकास निर्माण करणे’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली होती. या पाच वर्षांत केल्या कामाची संपूर्ण माहीती आता आपल्या एका क्लिक वर पहायला मिळणार मिळणार आहे.

गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, स्वच्छ महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सौभाग्य योजना इत्यादी सर्व योजनांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याने त्या सर्व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळाला आहे. सर्व योजनांचे आत्तापर्यंत झालेले काम त्या-त्या योजनेच्या संबंधित विभागाच्या वेबसाईटवर बघायला मिळायची.  पण आता फडणवीस सरकारच्या कामाचा अप टू डेट ‘लेखा-जोखा’ एका क्लिक वर आपल्या बघायला मिळणार आहे. हे सर्व तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीमुळेच शक्य झाले.

विकास दर्शक या मुख्यमंत्री डॅशबोर्डमुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार असून कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन प्रशासनाची विश्वासार्हता वाढणार आहे. ई-गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी या डॅशबोर्डमुळे नक्कीच मदत होणार, डेटा संचालित प्रशासन (data driven governance) आणि प्रत्यक्ष वेळेत प्रशासन (Real Time Governance) या दोन महत्वपूर्ण बाबी यातून साध्य होणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत फडणवीस सरकार ‘अप टू डेट’ झाल्याची सगळीकडे चर्चा आहे.

तसेच योजनेसंबधी इतर काही माहिती हवी असल्यास ‘चॅटबोट’ या ऍप्लिकेशनद्वारे प्रत्यक्ष प्रश्नही विचारता येणार आहेत. अधिक माहिती साठी  https://cmdashboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्यावी