प्रियंका गांधी म्हणजे ‘पप्पी’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

0
574

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पप्पू तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा ‘पप्पी’ असा उल्लेख   भाजप नेते व केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी एका कार्यक्रमात केला. त्यांच्या  या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सिकंदराबाद येथे आयोजित एका सभेत महेश शर्मा बोलत असताना त्यांच्या विधानाचा  व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून महेश शर्मा यांच्यावर टीका होत आहे.

शर्मा म्हणाले की, आता पप्पू म्हणतोय की मला पंतप्रधान व्हायचं आहे. आणि आता तर पप्पूची पप्पीदेखील आली आहे.  म्हणजे आता मायावती, अखिलेश यादव, पप्पू आणि पप्पूची पप्पीदेखील आली आहे’, असे वादग्रस्त विधान महेश शर्मा यांनी केले आहे.