भाजप-शिवसेना युतीने दलित मतांना ग्राह्य धरु नये – रामदास आठवले

0
652

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना युतीने दलित मतांना ग्राह्य धरु नये, असा  इशारा आरपीआयचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला दिला आहे. त्यांनी आमचा आदर करावा आणि मगच आमच्याकडून आदराची अपेक्षा करावी, असेही आठवले यांनी  म्हटले आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आठवले यांनी युतीवर नाराजी व्यक्त केली आहे.  आठवले म्हणाले की, आताच्या परिस्थितीत युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे ही घाई ठरु शकतो.  रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत आहे.  भाजप- शिवसेनेने दलित मतांना ग्राह्य धरु नये.

मुंबई उत्तर पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, असेही  आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला किमान एक जागा आणि विधानसभा निवडणुकीत किमान आठ जागा आम्हाला द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.