प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरुन हकालपट्टी

0
403

नवी दिल्ली,दि.२८(पीसीबी) – संसदेत बोलत असताना नथुराम गोडसेचा देशभक्त असा पुनरुच्चार करणे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना चांगलेच महागात पडले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरुन त्यांना काढून टाकण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर वर्णी लागली होती. मात्र, संसदेत बोलत असताना साध्वींनी नथुराम गोडसेचा उल्लेख देशभक्त असा केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीतून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैवी असून आम्ही त्याची निंदा करतो, असं नड्डा म्हणाले आहेत.