राष्ट्रवादीकडे काँग्रेसची उपमुख्यमंत्रिपदाची मागणी?

0
314

मुंबई,दि.२९(पीसीबी) – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. अशात काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरला जात असल्याची माहिती मिळत आहे.

सत्तावाटपात मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेला १६, राष्ट्रवादीला १५ तर काँग्रेसला १२ मंत्रिपदं देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काँग्रेसने आणखी एका मंत्रिपदाचा आग्रह धरल्याचं कळतंय. विधानसभेचे अध्यक्षपद न देता उपमुख्यमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

उपमुख्यमंत्रिपद अथवा विधानसभा अध्यक्षपद असा पर्याय काँग्रेससमोर ठेवण्यात आला होता. बुधवारी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद घेण्याचं मान्य केलं होतं. मात्र, आता उपमुख्यमंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली आहे.