पैसे आणि यश हे आयुष्यभर पुरत नाही, तुम्ही काहीतरी लाज बाळगा – तनुश्री दत्ता

0
666

मुंबई, दि. (पीसीबी) – गेल्या आठवड्याभरापासून तनुश्री दत्ताने नानापाटेकरसह अन्य काही जणांवर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूडमधले वातावरण ढवळून निघाले आहे. नाना पाटेकरनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्यसह राज ठाकरे यांच्यावरही तिने टीका केली. आता मात्र तिने आपला मोर्चा अक्षय कुमार, फराह खान, साजिद नाडियाडवाला यांच्याकडे वळवला आहे.

फराह खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हाऊस फुल ४’ टीमचा फोटो शेअर केला आहे. यात नाना पाटेकरदेखील आहेत. यामुळे नाराज झालेल्या तनुश्रीने चित्रपटाच्या टीमवर टीका केली आहे. ‘माझ्यावर जी परिस्थिती ओढावली आहे, तिच तुमच्या मुलींवर आली तर? त्यांच्यावर अन्याय करणारा माणूस तुमच्या डोळ्यासमोर असा मोकाट असता तर? मला हा प्रश्न या चित्रपटात नानासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला विचारावासा वाटत आहे. पैसे आणि यश हे आयुष्यभर पुरत नाही, तुम्ही काहीतरी लाज बाळगा’ असा टोला तिने कलारांना लगावला आहे.