पूरग्रस्त महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स देणार – पंकजा मुंडे

0
704

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – सांगली- कोल्हापूर भागातल्या पूरग्रस्त महिलांचे आरोग्य निरोगी रहावे, मासिक पाळीच्या काळात त्यांची अडचण होऊ नये यासाठी ग्रामिण विकास मंत्रालय ‘उमेद’ तर्फे आठ अस्मिता प्लस असलेली ४५ हजार सॅनिटरी नॅपकिन्सची पॅकेट्स उपलब्ध करून देणार आहेत.

ही मदत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याकडून ही मदत करण्यात येणार आहे. सांगली-कोल्हापूर भागात सध्या पुरामुळे लोकांची घर वाहून गेली आहेत. त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, अन्न-धान्य पुरवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. सरकारी यंत्रणा आपल्या परीने काम करत आहे, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.