गुजराथमध्ये पोरबंदरला ६०० किलो ड्रग्ज जप्त, १४ पाकिस्तानी व्यापाऱ्यांना अटक

0
43

पोरबंदर : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने रविवारी अरबी समुद्रात भारतीय सीमेवर 600 किलो ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत 600 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. या पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 14 पाकिस्तानी व्यापाऱ्यांनाही अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी गीर सोमनाथ पोलिसांनी वेरावळ शहरातील घाटावर 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. तेव्हापासून दिल्ली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), गुजरात एटीएस आणि इतर केंद्रीय एजन्सी या तस्करांना पकडण्यासाठी कारवाई करत होत्या.

भारतीय तटरक्षक दलाने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर या बोटीच्या शोधासाठी रात्रभर मोहीम राबविण्यात आली. पाकिस्तानी बोट पश्चिम अरबी समुद्रात पकडली गेली, ज्यामध्ये 14 पाकिस्तानी क्रू मेंबर्स होते. त्यांच्याकडून 80 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.

गेल्या फेब्रुवारीमध्ये एनसीबी आणि भारतीय नौदलाने गुजरात किनाऱ्याजवळ आजपर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली होती. या कारवाईत 3 हजार 132 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याची किंमत 1000 कोटींहून अधिक होती. यासोबतच पाच पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.