देवदूत ठरलेल्या जवानास एका चिमुकलीचा सलाम

0
481

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राज्यात कोल्हापूर आणि सांगलीत पुराने थैमान घातले. या महापूरात मोठी वित्तहानी आणि जीवीतहानीदेखील झाली. अचानक नदीला आलेल्या पूराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आणि लोखो लोक घरात अडकून पडले होते. त्यांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम, त्यांना या महापुरातून वाचवण्याचे काम भारतील जवान, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांनी केले. रेसक्यू करून बालके, वृद्ध यांना या जलसंकटातून वाचवले.

संकटकाळी लोकांना वाचवणारे जवानच या पीडीतांसाठी देवदूत बनलेत. या देवदुताचे आभार मानण्यासाठी एका चिमुकलीने जवानाला सॅलूट केले आणि तुम्ही खूप चांगले काम करतात असे ती त्यांना म्हणाली. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात पंचगंगा, कोयना नदीला आलेल्या पुरात शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता या गावांच्या, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी मदतीचे राज्यभरातून लाखो हात पुढे येत आहेत.