पुण्यात एकाच दिवसात सहा ठिकाणी चोरीच्या घटना

0
655

पुणे, दि. ६ (पीसीबी) – शहरातील विविध ठिकाणी आज (सोमवार) सकाळी चोरट्यांनी धुमाकुळ घालून तब्बल सहा ठिकाणी चोऱ्या केल्या. यामध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फडके हौद येथे महिलेच्या गळ्यातील दीड तोळे तर लोखंडे तालिम येथे दोन तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. वानवडी येथे जगताप चौकात दोन तोळ्याचे मंगळसुत्र तर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३.३ तोळ्याचे दागिने लंपास केले. बिबवेवाडी परिसरात मानस अपार्टमेंट येथे सकाळी साडे नऊच्या सुमारास दीड तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरसीएम कॉलेज येथे सकाळी पावणे वाजता चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हे सर्व गुन्हे एकाच टोळीने केल्याची शक्यता असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.