पुणे, सातारा-सांगली सह १७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुका लवकरच

0
15

मुंबई, दि. १६ : विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येणार असून त्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, २९ महापालिका आणि ३६ पैकी २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही पार पडल्याने अडीच वर्षापासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या १७ जागांचीही निवडणूक लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याने विधान परिषदेच्या १७ जागा भरण्यासाठी हालचाली सुरू आहेत. १७ मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण मुद्यावर अद्याप १६ जिल्हा परिषदाची निवडणूक बाकी असल्या तरी परिषदेच्या १७ जागांची निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नाही, असे समजते.

पुणे, सातारा-सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजी नगर-जालना, नागपूर या जिल्ह्यांतून स्थानिक स्वराज्या संस्था सदस्यांनी विधान परिषदेसाठी निवडूण द्यावयाचे आमदार लवकरच मिळतील, असे सांगण्यात येते.