पुणे विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानात सापडले २२ जिवंत काडतुसे

0
828

पुणे, दि. १० (पीसीबी) – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पाईस जेट विमानाने बेंगळुरूला प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेजमधून तब्बल २२ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार पहाटे पावणे पाचच्या सुमारास उघडकीस आला.

दिलीप पाटील (वय ५८) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास स्पाईस जेट विमानाने दिलीप पाटील हे बेंगळुरुला निघाले होते. यावेळी सुरक्षा रक्षकाने केलेल्या तपासणीत दिलीप यांच्या बॅगेत तब्बल पाँईंट २२ कॅलिबरची २२ जिवंत काडतुसे आढळून आली. विमानतळ पोलीसांनी दिलीप यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.