पीएफआयच्या १०६ कार्यालयांवर छापेमारी

0
238

– देशविरोधी आणि समाजविघातक कारवायांमध्ये या संघटनेचा हात असल्याचा आरोप

पुणे, दि. २२ (पीसीबी) – पॉप्युलर फ्रंट इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या देशभरातील १०६ कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी एकाचवेळी छापेमारी केली आहे. यात आतापर्यंत जवळपास १०० हून अधिक कार्यकर्त्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. यात महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूरसह मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणीतील पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. ED म्हणजेच सक्तवसुली संचलनालय आणि NIA म्हणजेच राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण यासह राज्य पोलीस दल आणि जीएसटी पथकासह केंद्रीय तपास यंत्रणांकडून पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु आहे. पण आता हे पीएफआय म्हणजे नेमकं काय? ही छापेमारी का सुरु आहे?

तेच जाणून घेऊयात या
पीएफआय ही संघटना म्हणजे नेमकं काय? ही संघटना काय काम करते? पीएफआयचा फुल फॉर्म सांगायचा झाला तर, पॉप्युलर फ्रंट इंडिया. ही कट्टर इस्लामिक संघटना आहे, पुण्यातील कोंढव्यात मुख्यालय आहे. २००६ साली नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट म्हणजेच एनडीएफचा उत्तराधिकारी म्हणून या संघटनेची स्थापना झाली.

राष्ट्रीय विकास आघाडी, मणिता निथी पासराय, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि इतर संघटनांमध्ये विलीन झाली भारत सरकारकडून अनेकदा देशविरोधी आणि समाजविघातक कारवायांमध्ये या संघटनेचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. तर तिकडे पी.एफ.आय. स्वत: ला लोकांच्या न्याय, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध म्हणून काम करणारी नव-सामाजिक चळवळ म्हणून कार्यरत असल्याचं सांगते. केरळ आणि कर्नाटकात अनेकदा पीएफआय आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याची नोंद आहे.

अत्यंत गंभीर स्वरुपचे आरोप –
२०१० साली धार्मिक वक्तव्याच्या वादातून PFI कार्यकर्त्यांनी एका प्राध्यापकाचे हात कापले. पीएफआय संघटनेवर अनेक राजकीय हत्यांचा आरोप आहे २०१६ साली संघाच्या एका नेत्याच्या हत्येच्या आरोपाखाली PFI संघटनेच्या चौघांना अटक करण्यात आलं. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली दंगलीवेळी लोकांच्या भावना भडकावल्याचा आरोपही संघटनेवर आहे. ऑगस्ट २०२० मध्ये बंगळुरु दंगलीतही PFI चा हात असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर २०२० मध्ये हाथरसमध्ये प्रक्षोभक भाषणाचा आरोप PFI संघटनेवर आहे. मार्च २०२२ मध्ये कर्नाटकातील हिजाब प्रकरणातही या संघटनेचा हात असल्याचा आरोप आहे. एप्रिल २०२२ मधील दिल्ली, करौन आणि खरगौन येथील हिंसाचारातही हात असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रात कुठे कुठे छापेमारी झाली?

पुण्यातील कोंढवा आणि हडपसरमधील पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयांवर ईडी, एनआयए, एटीएस, जीएसटी अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली. पुण्यातून अब्दुल कयूम शेख आणि रझी अहमद खान या दोन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.

पुण्यासह नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी या ठिकाणीही तपास यंत्रणांची छापेमारी सुरु आहे

परंतु पीएफआयच्या कार्यालयांवरील छापेमारीबाबत एनआयएनं कमालीची गुप्तता पाळली आहे

NIA+ ED + राज्य पोलिसांची PFI विरुद्ध देशभरात छापेमारी

केरळ २२

कर्नाटक २०

महाराष्ट्रात २०

तामिळनाडू १०

आसाम ९

उत्तर प्रदेश ८

दिल्ली ५

मध्य प्रदेश ४

पाँडिचेरी ३

राजस्थान २

आता देशात एकाच वेळी तब्बल १०६ ठिकाणी छापेमारी का करण्यात आली?

दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणं, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे आणि १००हून अधिक सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे