पिंपळे सौदागर येथे गुटखा विक्री प्रकरणी तरुणाला अटक

0
259

गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

सांगवी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने पिंपळे सौगदार येथे पान स्टॉलवर कारवाई केली. पान स्टॉल चालवणाऱ्या तरुणाला अटक करून सात हजार 742 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 6) दुपारी साडेतीन वाजता करण्यात आली.

मारुती गंगाधर देशमुख (वय 20, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोविंद चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारुती देशमुख याचा काटे वस्ती पिंपळे सौदागर येथे कोहिनूर पान स्टॉल आहे. त्याने पान स्टॉल मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत गुन्हे शाखा युनिट चारला माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी पोलिसांनी पान स्टॉलवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी सात हजार 742 रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी मारुती देशमुख याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.