पिंपळे गुरवमध्ये ऑनलाईन डेटिंग साईटव्दारे ओळख झालेल्या महिलेने विवाहित पुरुषाला केले ब्लॅकमेल

0
1794

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – लोकॅन्टो नावाच्या ऑनलाईन डेटिंग साईटवर ओळख करुन एका महिलेने दुसऱ्या एका महिलेला विवाहित पुरुषासोबत शरीर संबंध ठेवण्यास पाठवले. या पुरुषाने त्या महिलेसोबत दोनचा शरीर संबंध ठेवले आणि पैसे एका वेळचेच दिले. यावर महिलेने त्या पुरुषाकडे आणखी पैशांची मागणी केली. तो पुरुष पैसे देण्यास तयार ही होता. मात्र महिलेने ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच ते न दिल्यास त्याच्या घरच्यांना झालेल्या प्रकाराबाबत सांगण्याची धमकी दिली. ही घटना रविवार (दि.६) सायंकाळी पाच ते सोमवार (दि.७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी एका ४० वर्षीय विवाहित पुरुषाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका २७ वर्षीय तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४० वर्षीय पुरुषाची आरोपी २७ वर्षीय तरुणीसोबत लोकॅन्टो नावाच्या ऑनलाईन डेटिंग साईटवर ओळख झाली होती. रविवारी ठरल्या प्रमाणे या तरुणीने सना नावाच्या तरुणीला या विवाहित पुरुषासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी पाठवले. यावेळी या पुरुषाने सनासोबत दोन वेळा शरीर संबंध ठेवले आणि अडीच हजार रुपये तिला दिले. थोड्या वेळाने आरोपी २७ वर्षीय तरुणीने फिर्यादी पुरुषाला फोन करुन तुम्ही एकाच वेळचे पैसे दिले आणि दोनदा शरीर संबंध ठेवले. यामुळे आणखी दिड हजार रुपये द्या अशी मागी केली. फिर्यादी पुरुष ते देण्यास ही तयार झाला. मात्र आरोपी तरुणीने फिर्यादी यांना पुन्हा व्हॉट्अॅपवर मेसेज करुन ५० हजारांची मागणी केली. तसेच ते न दिल्यास ऑफीस आणि घरच्यांना झालेल्या प्रकाराबाबत सांगीन अशी धमकी दिली. तसेच तडजोड करुन १० हजार रुपये स्वीकारले. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.