आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द; मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

0
361

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) –  सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मोठा दणका दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सीव्हीसीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आलोक वर्मा यांचा पुन्हा सीबीआयचे संचालक म्हणून रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आलोक वर्मा यांचा कार्यकाळ जानेवारी अखेरपर्यंत आहे.