पिंपळेसौदागरमधील रोसलँड सोसायटीचे एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी

0
634

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन येथे रोसलँड सोसायटी, पक्षीमित्र चंदन चौरसीया आणि जिग्ना शहा यांच्या योगदांनातून पक्षासाठी खाद्य व पिण्याच्या पाण्याचे भांडे तसेच उन्हांपासून संरक्षण करण्यासाठी घरटे उपलब्ध करुन देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय चिमणी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी (दि. २०) भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते पक्षी संरक्षणाच्या या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

यावेळी रोसलँड सोसायटीचे चेअरमन संतोष म्हसकर, आयोजक चंदन चौरासीया, जिग्ना शहा, पत्रकार अजय जैन, कल्याणी निकुंभ, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष झोपे, काळुराम कवितके व सोसायटीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.