डांगे चौकात भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
569

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडके दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास डांगे चौक येथे घडली.

सिद्धार्थ सुदाम सावंत (वय ४०, रा. टाकळी, जि. परभणी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात काम सध्या सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास दुचाकीस्वार सावंत हे डांगे चौक ते भूमकर चौक यादरम्यान त्यांच्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी भरधाव टॅम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.