पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांसाठी ६६ कोटींच्या खर्चास स्थायीची मंजुरी   

0
462

पिंपरी, दि. १६  (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र.९  नेहरूनगर येथील जुनी शाळा इमारत पाडून नविन शाळा इमारत बांधणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ७ कोटी ९३ लाख रूपयांच्या खर्चासह विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण सुमारे ६६ कोटी २० लाख रूपये खर्चास  आज (सोमवार)  स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर स्थापत्य  विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी येणा-या सुमारे ५४ लाख ५६ हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे नाशिक रस्त्याच्या पश्चिम बाजूस स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करणेकामी येणा-या सुमारे २७ लाख ५० हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मध्ये धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळेववस्ती, व परिसरामध्ये पावसाळी गटरची सुधारणा   करणेकामी येणा-या सुमारे २७ लाख ४९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १५ से.क्र. २७, २७ अ २८ व आकुर्डी गावठाण मध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणा-या सुमारे २५ लाख ७६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

विविध विभागाकडील संगणक यंत्रणा देखभाल व दुरूस्तीकामी येणा-या सुमारे ७८ लाख ६५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मनपाची शाळा, कार्यालये, रूग्णालये इत्यादी इमारती वर उर्जा बचत कामी सौरउर्जेवर वीजनिर्मिती करणेकामी येणा-या सुमारे २६ लाख ५९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.११ मधील महाबली चौक ते जुन्या आर.टी.ओ ऑफीस पर्यत क्रॉकीटचा रस्त्यावर विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ५५ लाख ८ हजार  रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.