राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्यामुळे रोहित पवार अडचणीत

0
891

अहमदनगर, दि.१६ (पीसीबी) – कर्जत जामखेडमधून विधानसभा लढविण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या मंजुषा गुंड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांचे नातू व जिल्हा परिषद सदस्य  रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  

मंजुषा गुंड यांनी   कर्जत जामखेडमधून विधानसभा लढविण्याची  तयारी  सुरू केली आहे.  मात्र,  लोकसभा निवडणुकीपासून  कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा  दावा केला.  तसेच त्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामुळे  गुंड  यांच्या निवडणूक लढविण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.

कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीची संघटना  वाढविण्यासाठी गुंड दाम्पत्याने मोठे योगदान आहे. आता ऐनवेळी रोहित पवारांनी या मतदारसंघावर दावा केल्याने  गुंड दाम्पत्याना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, मंजुषा गुंड यांनी लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करून  भाजप प्रवेशाचा निर्णय  येत्या दोन ते तीन दिवसात  घेतला जाईल, असे म्हटले आहे.