पुणे; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

0
499

पुणे, दि.१७ (पीसीबी) – पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (१९ सप्टेंबर ) विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (२० सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत.

पर्वती जलकेंद्र- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता, मिठानगर, शिवनेरीनगर आणि पद्मावती

वडगाव जलकेंद्र- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

चतु:शृंगी- एसएनडीटी  वारजे जलकेंद्र- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी आणि भूगाव रस्ता.

लष्कर जलकेंद्र लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर,

महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर आणि सातववाड.

नवीन होळकर पंपिंग- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि नगर रस्ता.