पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात अत्याचार पीडित मुलीवर उपचार करण्यास विलंब, नातेवाईकांचा डॉक्टरांना घेराव

0
716

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – अत्याचार पीडित मुलीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी विलंब लावल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना घेराव घातला. ही घटना आज (गुरुवार) दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान घडली.  त्यामुळे रुग्णालय परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आत्याचार पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी आणले होते. परंतु, मुलीवर तातडीने उपचार न करता डॉक्टरांनी पीडित मुलीला दोन तास थांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांसह वायसीएमचे प्रमुख डॉ. पवन साळवे यांना घेराव घातला. यामुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, रुग्णालयाची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत मुलीला २५ ते ३० मिनिटेच थांबावे लागले. लैंगिक अत्याचाराची केस असल्याने त्यांना योग्य ते उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. साळवे यांनी दिली आहे.