पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त

0
466

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरात अखेर कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेत याबाबची घोषणा केली. केंद्र सरकार दीड रुपये आणि तेल कंपन्या १ रुपये असे मिळून एकूण अडीच रुपये कपात करणार आहे.

इतकेच नाही तर, राज्यांनीही करांमध्ये कपात करावी, असे आवाहन अरुण जेटली यांनी केले. केंद्र सरकारकडून पेट्रेल-डिझेलवर प्रति लीटर दीड रुपयांची एक्साईज ड्युटी कमी, ऑईल कंपन्या प्रति लिटरमागे १ रुपयांचा दिलासा देणार. एकूण अडीच रुपये प्रति लिटर दिलासा मिळाला. या निर्णयामुळे सरकारच्या यंदाच्या महसुलावर १० हजार ५०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

राज्यानांही प्रति लिटर अडीच रुपये दिलासा मिळेल अशा पध्दतीने व्हॅट कमी करावा, असे आवाहन अरुण जेटली यांनी केले. जर राज्य सरकारनेही केंद्राप्रमाणे निर्णय घेतल्यास पेट्रोल-डिझेल दरात पाच रुपयांची कपात होऊ शकते.