थेरगावमध्ये आणखी एक बलात्काराचा प्रकार उघड; बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
1063

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – थेरगाव येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर नराधम बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने बिथरलेली तरुणी घरातून पळून गेली. मात्र तिच्या एकट्या पणाचा फायदा घेत दोन नराधमांनी हैद्राबाद आणि सोलापूरात तिच्यावर बलात्कार केला.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन तरुणीवर २०१६ पासून तिचा नराधम बाप बलात्कार करत होता. या त्रासाला कंटाळून तरुणी मुबंईतील सी.एस.टी रेल्वे स्थानक येथे पळून गेली होती. तीथे ती सामाजिक संस्थांच्या संपर्कात आली. तिला विश्वसात घेऊन तिची चौकशी केली असता तिच्या बापाने, हैद्राबाद येथील रेल्वेमधील एका व्यक्तीने तर सोलापूरातील रेल्वे स्थानकावरील एका व्यक्तीने असे तिघाजणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले. यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी पीडितेच्या बापाला अटक केली आहे. तर हैद्राबाद आणि सोलापूर येथील दोन्ही आरोपींचे वर्णन पीडितेने वाकड पोलीसांना सांगितले आहे. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.आर.स्वामी तपास करत आहेत.