पावणे दोन लाखांच्या सिगारेट चोरीला

0
228

चाकण, दि. २० (पीसीबी) – तीन अनोळखी चोरट्यांनी एक लाख 70 हजार रुपये किमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. ही घटना 19 ऑगस्ट रोजी सकाळी आळंदी फाट्याजवळ फॉरेस्टच्या परिसरात घडली.

गणेश व्यंकट राठोड (वय 30, रा. कडाचीवाडी, चाकण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड हे सेल्समन आहेत. त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या सिगारेटचा माल दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला. त्यामध्ये आयटीसी कंपनीची सिगारेट, गोल्ड फ्लॅग प्रीमियम, गोल्ड फ्लॅग लाईट, गोल्ड फ्लॅग किंग, ब्रिस्टॉल, क्लासिक माईल्ड, क्लासिक आईस बस्ट, क्लासिक डबल बस्ट, नेव्ही कट, गोल्ड फ्लॅग इंडीमेंट, न्यू स्मार्ट, अमेरिकन क्लो, गोल्ड फ्लॅग मिंट असे बॉण्ड असलेल्या एक लाख 70 हजार 486 रुपयांच्या सिगारेट चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.