किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

0
727

भोसरी, दि. २० (पीसीबी) – किरकोळ कारणावरून तरुणाला बरगडीत ठोसा मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १७) सकाळी रामनगर, बोपखेल येथे घडली. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आकाश मुकेश ढिलारे (वय १९, रा. रामनगर, बोपखेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप प्रदीप जिनवाल (रा. बोपखेल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढिलारे बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ ब्रश करत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. ‘तू बस स्टॉपला व चौकात बसायचे नाही. तुला दाखवू का’ असे म्हणत फिर्यादी यांच्या डाव्या बाजूला बरगडीजवळ जोरात ठोसा मारून जखमी केले. फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.