पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची केली विचारपूस

0
341

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे अपघात झालेल्या पिंपळगाव घोडा गावच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची तसेच त्यांच्या पालकांची पुणे जिल्हाचे पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साईनाथ हाॅस्पीटल भोसरी येथे भेट घेतली व आस्थेने विचारपूस करून चौकशी केली. तसेच हॉस्पिटलसाठी लागणार्या खर्चाची जबाबदारी सरकार घेईल असे सर्व नातेवाईकांना आश्वस्त केले.”

या प्रसंगी भाजपा पुणे जिल्हा (ग्रामीण) चे अध्यक्ष श्री. गणेशतात्या भेगडे, पिंपरी विधानसभा प्रभारी श्री. सदाशिवराव खाडे, मा. सत्तारूढ पक्षनेते श्री. नामदेवराव ढाके, संघटन सरचिटणिस श्री. अमोल थोरात, जिल्हा परिषद सदस्य श्री. अतुलभाऊ देशमुख, आंबेगाव तालुका भाजप अध्यक्ष डॉ ताराचंद कराळे, महेशदादा फाऊंडेशनचे अध्यक्ष कुंदन काळे उपस्थित होते.
साईनाथ हॉस्पिटलचे डॉ सुहास कांबळे यानी सर्व रुग्णांची सद्य परिस्थिती पालकमंत्री दादांना समजावून सांगितली.